भंडारा : कारधा टी-पॉइंटवर भीषण अपघात, चार जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी-पॉइंट परिसरात गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४:२० वाजता दोन चारचाकी वाहनांची धडक झाली. अपघातात चौघे जण जखमी झाले आहेत, परंतु सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटना आणि जखमींची माहिती -
स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच ४६ डी १४४१ भंडाऱ्याकडून कारध्याकडे जात असताना, मागून स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एमएच ३६ एएल ९५९४ ने धडक दिली. यामुळे स्कॉर्पिओमधील चार जण जखमी झाले. जखमींमध्ये मूलचंद साधूजी सहारे (७०, गिट्टी खदान, नागपूर), कमलाबाई गणलाल खेडकर (६०, नागरा, जि. गोंदिया), नीतासु नवीन खेडकर (४, नागरा, जि. गोंदिया) आणि दुर्गेश सोलीराम तुमसरे (२८, डवा, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) यांचा समावेश आहे.
मदत आणि उपचार -
अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. तत्काळ जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेने जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना, पोलीस प्रशासनाने घटनेची नोंद केली आहे आणि तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




