दाताळा येथे २९ नोव्हेंबरला २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्र जागरण, शौर्य आणि समृद्धीच्या नवयुगाचा संकल्प घेऊन अखिल विश्व गायत्री परिवार, चंद्रपूरच्या वतीने २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प समारोहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महायज्ञाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ रविवार, २९ नोव्हेंबर रोजी दाताळा येथील श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ परिसरात होणार आहे.
सकाळी ११.३० ते दुपारी १२.२० या वेळेत अभिजित मुहूर्तावर भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सौ. सपना मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते हा सोहळा होणार आहे. गायत्री तीर्थ शांतिकुंज, हरिद्वारचे व्यवस्थापक श्री योगेंद्र गिरि यांच्या पावन सान्निध्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्रीराम सेतू मार्ग, दाताळा येथील श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ येथे हा सोहळा होणार असून, २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाच्या माध्यमातून राष्ट्रजागरण, आध्यात्मिक उन्नती आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश दिला जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल विश्व गायत्री परिवार, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




