महत्वाच्या बातम्या

 शिवणकाम आणि ज्यूट बॅग बनविण्याबाबत नि:शुल्क प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :  बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर रोड जुने डी.एड. कॉलेज जवळ, बाबूपेठ येथे ग्रामीण विभागातील युवकांसाठी शिवणकाम आणि ज्यूट बॅग बनविणे या निवासी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन २० नोव्हेंबर २०२६ पासून करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण घेणाऱ्याचे वय १८ ते ५० असावे. तसेच या प्रशिक्षणामध्ये व्यवसायातील अनुभवी व्यक्तींना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी ११ ते ५ वाजेपर्यंत बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील अनुप कासवटे (मो. नं ८४२१००९६०२) आणि अक्षय लांजेकर (मो.नं ९०२१९१३७५१) यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करावी व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos