महत्वाच्या बातम्या

 एसएनडीटीच्या विद्यार्थिनींची चंद्रपुरातील व्यावसायिक संस्थांना भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथील विद्यार्थिनींनी २२ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील विविध व्यावसायिक संस्थांना शैक्षणिक भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती जाणून घेतली.

बी. व्होक. इंटिरिअर डिझाइन, बी.कॉम. ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि बी.कॉम. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींसाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी चंद्रपूर येथील द ग्रँड आयकॉन, एनराइज बाय सयाजी आणि आर्ट इंटिरिअर या संस्थांना भेट दिली. अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

हॉटेल व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील विद्यार्थिनींनी हॉटेलमधील विविध सेवा, अतिथी सत्कार, ग्राहक व्यवस्थापन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील कार्यपद्धती समजून घेतली. तर इंटिरिअर डिझाइनच्या विद्यार्थिनींनी अंतर्गत सजावट, जागेचा प्रभावी वापर, रचना आणि आधुनिक डिझाइन संकल्पनांची माहिती घेतली. या भेटीमुळे विद्यार्थिनींना संबंधित उद्योगक्षेत्रातील कामकाज, व्यावसायिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधींची माहिती मिळाली.

या उपक्रमात सहाय्यक प्राध्यापक विवेक पाटील, सोनल गेडाम आणि दीपिका उमरे सहभागी झाले होते. विद्यार्थिनींना प्रत्यक्ष व्यावसायिक वातावरणाचा अनुभव देऊन त्यांच्या कौशल्यविकासाला चालना देणे आणि भविष्यातील करिअरसाठी तयार करणे, हा या शैक्षणिक भेटीचा प्रमुख उद्देश होता.





  Print






Related Photos