महत्वाच्या बातम्या

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा


- सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : क्रीडा विभागातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या दोन वर्षांकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत.

राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासोबतच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडूंसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळाडूंसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

शासनाच्या २९ डिसेंबर २०२३ आणि २५ जानेवारी २०२४ रोजीच्या निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली २०२३ निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या पुरस्कार वर्षांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

इच्छुक पात्र उमेदवारांनी १२ ऑक्टोबर २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आहे. विहित मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने पात्र क्रीडापटू व मार्गदर्शकांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos