ईद-ए-मिलादुन्नबी रॅलीत बंधुभावाचा संदेश : सहभागी नागरिकांना फळांचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त संघमित्रा चौक मित्र परिवार आणि बल्लारपूर मुस्लिम सेवा संस्थेच्या वतीने सामाजिक सलोखा व बंधुभावाचा संदेश देत रॅलीतील सहभागी नागरिकांना विविध फळांचे वाटप करण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आयोजित रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मौलाना व नागरिकांचे नगराध्यक्ष अल्का ताई वाढई यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी रॅलीतील सहभागींसाठी सफरचंद, केळी, मोसंबी व डाळिंबाचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान तालुका महिला अध्यक्ष अफसाना सय्यद व रेखा रामटेके यांच्या हस्ते नगराध्यक्षा अल्का वाढई यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेविका वैशाली हुमणे व ॲड. मेघा भाले यांचे आरिफ कुरेशी व प्रीतम पाटील यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाला नगरसेवक अब्दुल करीम, इस्माईक ढाकवाला, भास्कर माकोडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. आय. ए. सय्यद, शकील शेख, मोहंमद शेख, अख्तर खान पठाण, मुबारक शेख, सुहान शेख, अयान शेख, फारुख शेख आदींनी परिश्रम घेतले.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून सामाजिक एकोपा, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.




Petrol Price




