महत्वाच्या बातम्या

 जुगार अड्ड्यावर मुल पोलिसांचा छापा : तीन जण ताब्यात, १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :  मुल तालुक्यातील नवेगाव जंगल परिसरात कुकुडरांझीच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगारावर मुल पोलिसांनी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ताशपत्ते आणि चार दुचाकी असा एकूण १ लाख ९२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी जंगलातील झुडपांचा फायदा घेऊन पसार झाले. ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभरे यांनी पोलीस पथकसह नवेगाव जंगल परिसरात छापा टाकला. यावेळी जुगार खेळणारे तीन जण पोलिसांना घटनास्थळी आढळून आले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, तर काही जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये अजीमखा लैलापखा पठाण ४२ वर्षे मुनीमखा तलबखा पठाण ३४ वर्षे आणि इसाक अब्बास शेख ३५ वर्षे तिघेही रा. आलेवाही, नवेगाव, ता. मुल, जि. चंद्रपूर यांचा समावेश आहे. तर सादिक पैताजखा पठाण ३० वर्षे रा. आलेवाही, नवेगाव, ता. मुल हा पोलिसांचा चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून गेला.

या कारवाईत पोलिसांनी चार दुचाकी त्यामध्ये एचएफ डिलक्स क्रं एमएच ३४ सीजी ९०३२, होंडा शाइन १२५ क्रं एमएच ३४ सीपी ५३३२, पॅशन प्रो क्रं एमएच ३४ बीवाय ०५८०) आणि लाल रंगाची दुचाकी क्रं एमएच ३४ सीएल ६१२५ असे किंमत १ लाख ९० हजार रुपये तसेच अंगझडती २ हजार रुपये रोख मिळाले. याशिवाय जुगाराच्या डावावर लावलेले ५५० रुपये आणि अंदाजे ५० रुपये किमतीचे ५२ ताशपत्ते असे एकूण २ लाख ९२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई मुल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभरे, पोलीस अंमलदार दिलीप आदे, प्रकाश चिकराम आणि शंकर बोरसरे यांनी केली. पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos