देसाईगंज : रेल्वे परिसरात आढळून आले अनोळखी इसमाचे प्रेत


- ओळख पटविण्याचे देसाईंज पोलीसांसमोर आव्हान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
शहरातील वडेगाव वडसा रेल्वे लाईन फाटकापासून काही अंतरावर रेल्वे परिसरात अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह कोणाचे आहे हे शोधने देसाईगंज पोलीसांसमोर आव्हान उभे ठाकले असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. 
वडसा रेल्वे परिसरात सकाळच्या सुमारास फिरण्यारिता निघालेल्या काही नागरिकांना वडेगाव वडसा रेल्वे फाटकापासून काही अंतरावर रेल्वे पटरीच्या बाजुला एका अनोळखी इसामाचे प्रेत आढळून आले. याबाबत नागरिकांनी लागलीच रेल्वे स्टेशन मास्टर यांना माहिती देली असता त्यांनी सदर घटनेबाबत देसाईगंज पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताचा देसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता ताब्यात घेतले. सदर घटना हत्या की रेल्वे अपघात याबाबत अधिक तपास सुरू असून देसाईगंज पोलीस त्या अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-08
Related Photos