पात्र शेतकरी कुटुंबीयास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २ हजार रुपये प्रती हप्ता मिळण्यास सुरुवात


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात प्रती वर्षी  ६ हजार रुपयांचा लाभ सुरु झाला आहे.
दिनांक ०९ ऑगस्ट, २०२१ रोजी प्रधानमंत्री यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना अंतर्गत देशातील ९.७५ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना नवव्या हप्त्यातील (ऑगस्ट २१ ते नोव्हेंबर २१ ) रू. १३,५७८.७९ कोटी रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण कार्यक्रम दिल्ली येथून ऑनलाइन पार पडला.
आता हस्तांतरित केलेली रक्कम शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे .  
फेब्रुवारी, २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशातील ११ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रू. १.३९ लाख कोटीहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे .
महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून दिनांक ०८ ऑगस्ट, २०२१ अखेर १०६.४७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. १३,५७८.७९/- कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे .
तसेच आजच्या दि. ०९ ऑगष्ट २०२१ रोजीच्या कार्यक्रमात दिनांक १ ऑगस्ट, २०२१ ते दिनांक ३० नोव्हेंबर, २०२१ या कालावधीकरिता देय नवव्या व इतर हप्त्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण १०१.०० लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रू. २२६० कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला. हा लाभ रब्बी २०२१ हंगामात साठी विविध कृषी निविष्ठां खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या मुळे कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे . 
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-10Related Photos