महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी ५२७ प्रकरणे निकाली


- मोटार अपघाताच्या प्रकरणात २८९१२०० रुपये नुकसान भरपाई पिडित पक्षकारांना मिळाल्यामुळे पिडीतांना दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार भंडारा जिल्हा न्यायालयात व तालुका न्यायालयात १२ सप्टेंबर, २०२६ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लाखनी दिवाणी न्यायालयातील लोक अदालतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुरचे प्रशासकीय न्यायमुर्ती, किलोर यांच्या हस्ते व आनंद, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा, नितीन रहांगडाले अध्यक्ष, सचिव विधी सेवा प्राधिकारण मिलिंदकुमार बुराडे, अध्यक्ष तालुका वकील संघ भुसारी, यांच्या उपस्थितीत  झाले. 

तसेच दिवाणी न्यायालय पवनी येथील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन न्यायमूर्ती पानसरे पालक न्यायमूर्ती, भंडारा जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश ३ मलिक, व जिल्हा न्यायाधीश ४, अध्यक्ष तालुका विधी सेवा समितीचे खेमराज जीभकाटे उपस्थितीत होते.   





  Print






Related Photos