राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा १० सप्टेंबर रोजी वर्धा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे बुधवार, १० सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती तसेच त्यानंतर रामटेककडे प्रयाण करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
राज्यमंत्री ॲड. जयस्वाल हे १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता बॅचलर रोड येथील स्व. दत्ताजी मेघे चौक नामांतर सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता रामनगर, वर्धा येथील सर्कस ग्राऊंडवर आयोजित बैलपोळा व कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.
बैलपोळा हा विदर्भातील शेतकरी व ग्रामीण भागाशी निगडित महत्त्वाचा पारंपरिक सण असून, त्यानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेती, कृषी तंत्रज्ञान व ग्रामीण संस्कृतीशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी व पदाधिकारी यांच्यात उत्सुकता आहे.
दौऱ्यातील नियोजित कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे सायंकाळी ६ वाजता रामनगर, वर्धा येथून रामटेककडे प्रयाण करतील, अशी माहिती त्यांच्या दौरा कार्यक्रमातून देण्यात आली आहे.




Petrol Price




