महत्वाच्या बातम्या

 नागपुरातून दुचाकी चोरून चंद्रपुरात आणली : कोब्रा व यमला एलसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागपूरमधून दुचाकी चोरून ती चंद्रपुरात आणल्यानंतर शहरात फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. गोपाल ऊर्फ कोब्रा जीवन मालाकर आणि यमला तंगराज कोरवान दोन्ही रा. इंदिरा नगर चंद्रपूर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली.

दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातील मोटारसायकलची तपासणी केली असता ती नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात अप. क्र. ५६३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल आहे. जप्त करण्यात आलेली MP-२०-MH-८१३५  क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल अंदाजे ५० हजार रुपये किमतीची आहे.

नागपुरातून चोरी केलेली दुचाकी चंद्रपुरात आणून वापरली जात असल्याचे तपासातून समोर आले. दोन्ही आरोपी आणि जप्त मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाडी पोलीस ठाणे, जिल्हा नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोहवा सतीश अवथरे, लालू यादव, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केले.





  Print






Related Photos