महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुरात भव्य महिला दहीहंडीचा जल्लोष : नारीशक्तीचा उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, बल्लारपूरच्या वतीने आयोजित भव्य महिला दहीहंडी उत्सव ५ सप्टेंबर रोजी स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राजवळ उत्साह, उमंग आणि जल्लोषात पार पडला. या उत्सवात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत नारीशक्ती, साहस, संघटनशक्ती आणि सांघिक भावनेचे दर्शन घडविले.

महिला दहीहंडी स्पर्धेमुळे उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला १० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक देण्यात आला. सहभागी संघांचा उत्साह वाढविण्यासाठी ३० प्रोत्साहनपर पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजप बल्लारपूर शहराध्यक्ष ॲड. रणंजयसिंह, महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशालीताई जोशी यांच्यासह सतविंदर सिंग दारी, मनीष पांडे, घनश्याम बुरडकर, देवेंद्र वाटकर, सतीश कनकम, ज्येष्ठ नेते निलेश खरबडे, समीर केने, युवा मोर्चाध्यक्ष मिथलेश खेंगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महिला मोर्चाच्या महामंत्री आरती अक्केवार, सारिका कनकम, वर्षा सुंचूवार, कांता ढोके तसेच नगरसेविका शालू कुमरे, विद्या खडतड यांच्यासह विविध बूथ व शक्ती केंद्र प्रमुख आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर मोहुर्ले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जयश्रीताई मोहुर्ले, ज्योती येनुमल्ला, डॉ. सुरेखा श्रीवास्तव आणि तहजीब खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सोशल मीडिया प्रमुख यशनील मंथनवार, प्रियंका शेंडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी प्रचार-प्रसार आणि आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

महिला दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून नारीशक्ती, संघटनशक्ती, सांघिक भावना आणि सामाजिक एकजुटीचा प्रभावी संदेश देण्यात आला. महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी आणि आयोजन समितीच्या अथक परिश्रमामुळे हा उत्सव उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.





  Print






Related Photos