तृतीय पंथीयांसाठीच्या कार्यक्रमासाठी स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वर्धा : तृतीयपंथीय एक दुर्लक्षित घटक असून या घटकास विकास प्रक्रियेत आणण्यासाठीं त्यांचा सर्वांगीन विकास करण्याकरीता त्यांना शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करुन देणे, त्यांचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक संस्थांनी १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तृतीयपंथीय हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून, या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणुक दिली जाते. नेहमीच भेदभाव व सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहीलेला आहे.
त्यामुळे या समाज घटकाचे शासनामार्फत मुलभूत अधिकाराचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याकरिता तृतीयपंथीय व्यक्ती (हक्काचे संरक्षण) कायदा, २०१९ नियम २०२० संपूर्ण देशात लागू झालेला आहे.
तृतीयपंथीय व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करुन देणे, त्यांचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करुन त्यांना राष्ट्रीय ओळखपत्र व प्रमाणपत्र देणे, रेशनकार्ड, मतदार नोंदणी करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्यांना कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन करणे आहे. जाणिव जागृती कार्यशाळा, प्रचार प्रसिध्दी अंतर्गत तृतीयपंथीयांबाबत भेदभाव रोखणे करिता शाळा, महाविद्यालयामधिल शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आश्रमशाळा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक जिल्हास्तर तसेच तालुकास्तरावरिल शासकीय कार्यालयामध्ये जाणिव जागृती कार्यकम, कार्यशाळा तसेच अनुषंगीक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच स्वयंरोजगार मेळावे, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम घेवुन प्रशिक्षण देणे, तृतीयपंथीयांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करणे ईत्यादी कार्यक्रमाचे ३१ ऑक्टोंबर पर्यंत आयोजन करावयाचे आहे. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेकडून अर्ज, प्रस्ताव मागविण्यात येत आहे. ईच्छुक स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्रासह ते सदर कार्यक्रम व उपक्रम आयोजीत करण्यास ईच्छुक असल्याचे लेखी अर्ज १५ सप्टेंबर पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.




Petrol Price




