रत्नापुर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना व सामाजिक न्याय विभागाची स्वायत्ते संस्था डॉ .बाबासाहेब आंबेडकर व संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत पथदर्शी प्रकल्प विभाग नागपूर जिल्हा चंद्रपूर वतीने महासंचालक दीपा मुधोळ निबंक सुचिता शिंदे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही तालुक्यातील समतादूत कृपाली धारणे यांच्या कडून जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा व राजमाता मा. मानीका यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व अभिवादन करून घेण्यात आला. त्यानंतर समतादूत कृपाली धारणे यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले आदिवासी हा मूलनिवासी असून दर्या खोऱ्या त राहणारा व निसर्ग पूजक आहे आधीपासून या भूतलावर असणारा हा समाज मूलनिवासी आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले व बिरसा मुंडा यांचे कार्य ह्याच्यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य वासुदेव दडमल,ग्रामपंचायत सदस्य उषाताई धारणे, विद्यार्थी व संघटना अध्यक्ष अतुल बारेकर,सचिव भाविक दडमल,सांस्कृतिक प्रमुख प्रवीण ढोणे,सचिन ढोणे, प्रसिद्धी प्रमुख अनिकेत वाकडे,अंकुश सावसाकडे त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल बारेकर व आभार अनिकेत वाकडे यांनी मानले.
News - Chandrapur




Petrol Price




