संत तुकाराम महाराज सेवा मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ, बल्लारपूर–बामणी या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाची निवडणूक १२ जुलै २०२६ रोजी शांततापूर्ण वातावरणात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. राजेशकुमार लिंगे यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.
संस्थेच्या नियमावलीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत नाव सुचवून व अनुमोदन देत अकरा कार्यकारी संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर या अकरा संचालकांमधून पाच पदाधिकारी व सहा कार्यकारी सदस्यांची निवड करण्यात आली. सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी श्रीधर गोपाळराव फटाले, उपाध्यक्षपदी राजेंद्र नामदेव खाडे, सचिवपदी मनोहर रामभाऊ माडेकर, सहसचिवपदी सत्यशीला चांगदेव साळवे तर कोषाध्यक्षपदी मुरलीधर जयराम झाडे यांची बिनविरोध निवड झाली.कार्यकारी सदस्य म्हणून मार्कंडेय उद्धवराव बोंडे, चंद्रभान गणपत जोगी, गजानन नामदेव घुगूल, मनोहर दादाजी जीवतोडे, भास्कर मनोहर वडस्कर आणि उद्धव आडकुजी धोटे यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या विविध उपक्रमांना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार मंडळाचीही निवड करण्यात आली. सल्लागार मंडळात डॉ. रजनीताई हजारे, डॉ. अनिल वाढई, अनुप कुटेमाटे, युगराज बोबडे, विनायक साळवे, मधुकर सालवटकर, श्यामसुंदर धांडे, कुर्मदास काळे, सूर्यकांत साळवे, पांडुरंग जरीले, पुरुषोत्तम पोटे, सुरेश नांदे आणि दत्तात्रय झाडे यांचा समावेश करण्यात आला.
तसेच संस्थेच्या वस्तीगृहाच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वस्तीगृह देखरेख समितीच्या प्रमुखपदी एल. के. बलकी यांची निवड करण्यात आली. समितीवर कमलताई वडस्कर आणि डॉ. अशोक घुंगरूडकर यांचीही नियुक्ती करण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सभासदांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
News - Chandrapur




Petrol Price




