गडचिरोली बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : व्यापारपेठ बंद शाळा-महाविद्यालयांवरही परिणाम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या बंद आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख व्यापार लाईन दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तसेच अनेक शाळा व महाविद्यालयांनीही बंदला प्रतिसाद देत शैक्षणिक कामकाज बंद ठेवले.
या आंदोलनात विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विविध प्रश्नांबाबत आक्रोश व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
बंद आंदोलनात वंचित आघाडीचे नेते बाळू टेम्भूर्णे, जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे, जि. के. बारसिंगे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जयश्री जराते, आजाद समाज पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महिला अध्यक्ष सोनाशी लभाने, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पवन गेडाम, रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, हंसराज उंदीरवाडे, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे मिलिंद बांबोळे, माकपचे डॉ. धर्मराज सोरदे, टायगर सेनेचे चंद्रशाह उईके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गौतम मेश्राम, विलास निंबोरकर, सुरज पीपरे, चंद्रकांत भोयर, प्रतीक डांगे, प्रितेश अंबादे आदींची उपस्थिती होती.
आंदोलनादरम्यान सहभागी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधत जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील व्यापारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी बंदला दिलेल्या प्रतिसादामुळे गडचिरोलीतील जनजीवनावर आंदोलनाचा मोठा परिणाम दिसून आला.
News - Gadchiroli




Petrol Price




