आजचे दिनविशेष


१३ जुलै महत्वाच्या घटना
१६६० : पावनखिंडीतील लढाई.Birthdays & Name Days
१८३७ : राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
१८६३ : सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.
१९०८ : ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
१९२९ : जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.
१९५५ : २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
१९७७ : रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.Government
१९८३ : श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.
२०११ : मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.
१३ जुलै जन्म
१८९२ : जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)
१९४२ : अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.
१९४४ : रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.
१९५३ : वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.Training & Certification
१९६४ : भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.
१९५० : मार्शल बेटांचे ५वे अध्यक्ष जुरेलांग झेडकिया यांचा जन्म (मृत्यू : ७ ऑक्टोबर २०१५)
१९४६ : भारतीय राजकारणी, गोव्याचे आमदार पांडुरंग राऊत यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर २०२२)
१६०८ : पवित्र रोमन सम्राट फर्डिनांड तिसरा यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १६५७)
१३ जुलै मृत्यू
१६६० : पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
१७९३ : फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.Time & Calendars
१९६९ : तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)
१९८० : बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.
१९९० : क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.
१९९४ : धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)
२००० : साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)
२००९ : हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९३०)
२०१० : सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३१)
१९२१ : लक्झेंबर्गर-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रिएल लिप्पमन यांचे निधन (जन्म: १६ ऑगस्ट १८४५)Language Resources
News - todayspecialdays




Petrol Price




