राजीव गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागात अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशसेवा, राष्ट्रीय एकात्मता आणि विकासाच्या मूल्यांना अनुसरून शपथ घेतली.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता संजोग मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या आधुनिक भारताच्या निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. तंत्रज्ञान, शिक्षण आणि युवकांच्या सहभागातून देशाच्या विकासाला गती देण्याचे कार्य त्यांनी केले, असे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयातील अभियंता वैभव जोशी, पवन सावरकर, तसेच अनिल आंबटकर, विनायक काकडे, हनीफ कुरेशी, शितल पोडे यांच्यासह कार्यालयीन सहकारी अरविंद कुचनकर, परिवर्तन वरखेडे, माधवी मेश्राम, हरिदास डंबारे, बावणे, गिरडकर, सौदागर, महेश उईके, प्रसाद कातपातल तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. साध्या व उत्स्फूर्त वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.




Petrol Price




