पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अमली पदार्थांविरोधी जनजागृती रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर उद्या २६ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
शुक्रवार २६ जून रोजी सकाळी ८ वाजता जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते या रॅलीचा शुभारंभ होईल. सकाळी ९ वाजता पालकमंत्री डॉ.भोयर स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी १० वाजता मातोश्री सभागृह येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमास उपस्थित राहतील.
News - Wardha




Petrol Price




