महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यात अवैध दारूविरोधात धडक कारवाई : ६० हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि साठ्याविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तुमसर, लाखनी आणि साकोली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ६० हजार ९८० रुपयांचा अवैध दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमसर शहरातील हनुमान वॉर्ड येथे कारवाई करून ईश्वर बडवाईक यांच्या ताब्यातून ४० लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईश्वरदत्त पंधरे आणि राहुल लांडगे यांच्या ताब्यातून सुमारे ४ हजार रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली.

दरम्यान, साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनीबांध येथील निलेश टेंभुर्णे याच्या ताब्यातून २ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन्ही कारवायांमध्ये मिळून ६० हजार ९८० रुपयांचा अवैध दारूसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos