भिवापूर वॉर्डात गांजाविक्रीवर चंद्रपूर शहर पोलिसांचा छापा : १५ हजारांचा गांजा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्ड परिसरात गांजाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत १ किलो १०९ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत १५ हजार रुपये असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग बानलवार असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे हे डीबी पथकासह शहरात पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत भिवापूर वॉर्डातील आरोपी पांडुरंग बानलवार हा आपल्या राहत्या घरी गांजाचा साठा करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधिताच्या घरावर छापा टाकला. घरझडती दरम्यान पहिल्या खोलीतील बेडखाली प्लास्टिकच्या पिशवीत वाळलेली हिरवी पाने, फुले, देठ व बिया असलेला १ किलो १०९ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेत जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, विलास निकोडे, तसेच डीबी पथकातील महिला पोलीस हवालदार भावना रामटेके, पोलीस हवालदार संजय धोटे, जावेद सिद्दीकी, रूपेश रणदिवे, संतोष दंडेवार, संतोष कनकम, कपूरचंद खरवार, पोलीस अंमलदार रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, सुशांत घिवे, प्रफुल भैसारे आणि दिपीका झिंगरे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




