महत्वाच्या बातम्या

 थरारक पाठलागानंतर गोवंश तस्करीचा भांडाफोड : कोरपना पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध गोवंश वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत कत्तलीसाठी क्रूरपणे वाहतूक करण्यात येणाऱ्या १० गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत टाटा योद्धा वाहनासह एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, १४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित टाटा योद्धा (क्र. MH-34-BZ-5431) या वाहनाचा पाठलाग करून तो ताब्यात घेण्यात आला.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १० गोवंशीय जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने दोरीने तोंड व पाय बांधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून जनावरांची सुटका केली व वाहनासह मुद्देमाल जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांची अंदाजे किंमत १ लाख रुपये, तर टाटा योद्धा वाहनाची किंमत २ लाख ६० हजार रुपये असून, एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित २०१५) मधील कलम ५(अ), ५(ब), ६, ९, ११(१)(ड) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० आणि मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १८४ अन्वये कोरपना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अंमलदार विक्रम दासस्वार, पोलीस अंमलदार सटवा नामपल्ले आणि पोलीस अंमलदार विशाल मोरे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos