महत्वाच्या बातम्या

 सामूहिक विवाह करणाऱ्या दाम्पत्यांसाठी कन्यादान योजना : १५ जुलैपर्यंत अर्ज करा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या दाम्पत्यांसाठी राज्य शासनाची कन्यादान योजना लागू असून, २०२६-२७ या वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत वधूच्या पालकांना २५००० तर सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला प्रत्येक जोडप्यामागे ४००० अनुदान दिले जाते.

इच्छुक दाम्पत्यांनी सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेमार्फत आवश्यक कागदपत्रांसह १५ जुलै २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर कार्यालयात अर्ज सादर करावा.

पात्रता -

वधू-वर महाराष्ट्राचे अधिवासी असावेत.
दोघांपैकी एक किंवा दोघेही SC, VJ, NT धनगर व वंजारीसह SBC किंवा OBC प्रवर्गातील असावेत.
वराचे वय किमान २१ वर्षे व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
प्रथम विवाहासाठी लाभ लागू असून, विधवा महिलेच्या दुसऱ्या विवाहालाही लाभ मिळू शकतो.
सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सामूहिक विवाह आयोजित करणारी संस्था नोंदणीकृत असावी आणि सोहळ्यात किमान १०  जोडपी सहभागी असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos