पेंढरीत एकल महिलांचा मेळावा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत पेंढरी, कोकेवाडा, मुरपार येथील विधवा, घटस्फोटीत महिला मेळावा सरपंच तारा अरविंद राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २३ जून रोजी आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ग्रामपंचायत अधिकारी अमोल वाळके यांनी उपस्थित महिलांना त्यांना मिळणाऱ्या शासनाच्या योजनाची माहिती देऊन त्यांच्या नावाची नोंद करून शासन स्तरावर कळविण्यात येईल असे मार्गदर्शनात सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या मंदा चौखे, ममता शेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
News - Chandrapur




Petrol Price




