महत्वाच्या बातम्या

 प्रेमलशहा आत्राम यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील उमरवाही येथील शेतकरी प्रेमलशहा आत्राम यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने सन २०२४ मधील विविध कृषी पुरस्कारांची घोषणा २३ जून रोजी करण्यात आली. राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. नावीन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब, उत्पादनवाढ, कृषी क्षेत्रातील प्रयोगशीलता आणि इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणारे कार्य या निकषांच्या आधारे पुरस्कारार्थीची निवड करण्यात येते.

या पुरस्काराचे स्वरूप ४४ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे. १ जुलै २०२६ रोजी कृषी दिनादिवशी या शेतकऱ्यांचा सन्मान मुंबई येथे होणार आहे. कृषी विभागाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय व प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शेतकरी प्रेमलशहा आत्राम यांची निवड झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सिंदेवाही कृषी विभागाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आलाअसून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे, नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करणारे आणि शेतकरी विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले शेतकरी म्हणून प्रेमलशहा आत्राम यांचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos