महत्वाच्या बातम्या

 पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजाच्या संयुक्त विद्यमाने १८ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१८ मे रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील नामवंत कंपन्या सहभागी होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मायक्रोफिन लिमिटेड नागपूर यांच्याकडे असलेल्या १०० फिल्ड अधिकाऱ्यांच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना १० हजार ते २० हजारपर्यंत पगार देण्यात येणार असून इन्सेटीव्ह दिल्या जाणार आहे. उत्कर्ष  फायनान्स  बँक लिमिटेड पुलगाव यांच्याकडील ४० रिक्त पदे, वैभव इन्टरप्रायजेस नागपूर यांच्याकडील १०० रिक्त पदे, नोबिनो हेल्टकेअर मिहान नागपूर यांच्या १५० रिक्त पदासाठी अशा एकुण ३९० पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

रोजगार मेळाव्यात प्रधानमंत्री इंटरशीप योजनेबाबत तसेच इस्त्राईल देशात होम बेस करीअर या क्षेत्रात उपलब्ध रोजगाराच्या संधीबाबत माहिती देण्यात येणार आहे. मेळाव्यात एचएससी पास, पदवी व आयटीआय उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्ष असावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी मुळ शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रासह मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos