महत्वाच्या बातम्या

 रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ अंतर्गत धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ मध्ये धान खरेदीसाठी शासनाच्या BeAM पोर्टलवर धान खरेदी सुरू आहे. धान खरेदीची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून या कालावधीत धान खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या अ व ब वर्ग सभासद संस्थांमार्फत संचालित धान खरेदी केंद्रांवर जाऊन आपल्या धानाची विक्री करावी. शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी धान विक्रीची प्रक्रिया पूर्ण करावी.

तसेच, ज्या शेतकऱ्यांनी BeAM पोर्टलवर नोंदणी केली आहे, त्यांनी संबंधित धान खरेदी केंद्राशी संपर्क साधून धान विक्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार तसेच जिल्हा पणन अधिकारी एस. पाटील यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos