महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नव्या सभागृहाचे उद्घाटन आणि अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षणास प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात नव्याने उभारलेल्या सभागृहाचे उद्घाटन तसेच बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बँकेच्या अध्यक्षा ईशा प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन समारंभात प्रशिक्षण मार्गदर्शक श्रीराम परुळेकर सर व  सुबोध अभ्यंकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयलवार सर आणि सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अध्यक्षा पोरेड्डीवार यांनी आपल्या भाषणात बँकेच्या विकासासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. बदलत्या बँकिंग व्यवस्थेत अद्ययावत कौशल्य, प्रशिक्षण आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी नियमित प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या सभागृहामुळे बँकेच्या प्रशासकीय आणि प्रशिक्षणविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे पार पडू शकणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षण मार्गदर्शकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक बँकिंग प्रणाली, व्यवस्थापन कौशल्ये, ग्राहक सेवा आणि संस्थात्मक कार्यक्षमता वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयलवार सर यांनी उपस्थितांना प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष कामकाजात प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नव्या सभागृहाच्या उद्घाटनामुळे बँकेच्या कार्यक्षमतेत आणि प्रशिक्षणास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos