महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलिसांकडून अवैध दारू व वाहनासह १४.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई करून एकूण १४ लाख ८७ हजार २००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक गडचिरोली, एम. रमेश यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन अहेरीच्या पथकाने २१ मे २०२६ रोजी सापळा रचून ही कारवाई केली. गोपनिय माहितीच्या आधारे, मौजा आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर एक अज्ञात इसम काळसर तपकीरी रंगाची बोलेरो कैम्पर (क्र. एमएच १२ एस एक्स ६९८१) चारचाकी वाहन घेऊन अवैध देशी व विदेशी दारू विक्रीसाठी उभा होता.

पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनामध्ये खालील अवैध पदार्थ आढळले:

१. बियर कॅन्स: ५०० एमएल क्षमतेचे १,१०४ बिअर कॅन (किंमत सुमारे ३,३१,२००/- रु.)
२. देशी दारू (रॉकेट संत्रा): १० एमएल क्षमतेचे २,२०० निपा (किंमत सुमारे १,७६,०००/- रु.)
३. विस्की (रॉगल स्टेंग डिलक्स): २००० एमएल क्षमतेचे १२० चील (किंमत सुमारे ५,८०,०००/- रु.)
४. वाहन: बोलेरो कैम्पर चारचाकी (किंमत सुमारे ५,००,०००/- रु.)

एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १४,८७,२००/- रुपये (चौदा लाख सत्तरा हजार दोनशे रुपये) आहे.

सदर प्रकरणी पोस्टे अहेरीत कलम ६५ अ. म.दा.का. अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरु आहे. तपास पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि हर्षल अकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनिअरुण फेगडे व पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि हर्षल ओकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos