महत्वाच्या बातम्या

 हिंगलाज भवानी वार्डातील विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर


- आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न : काॅंक्रीटीकरणासह सोयी सुविधांवर उपलब्ध होणार 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपूराव्या नंतर दुर्लक्षित असलेल्या बाबूपेठ येथील हिंगलाज भवानी वार्डाचा विकास करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. नगर विकास विभागाच्या विशेष रस्ता अनुदाना अंतर्गत हा निधी मंजुर करण्यात आला असुन या निधीतुन सदर भागात काॅंक्रिटीकरणासह मुलभुत सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

मतदार संघाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. शहरी आणि मतदार संघातील ग्रामीण भागासाठी त्यांनी विविध विभागाअंतर्गत मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतुन मतदार संघातील विकासकामांना गती मिळाली असुन अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. तर अनेक कामे प्रस्तावीत आहेत. आमदार होताच किशोर जोरगेवार यांनी मतदार संघाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी दुर्लक्षित भागांपासून विकासकामांना सुरवात केली आहे. चंद्रपूर शहराचे शेवटचे टोक असलेल्या किष्ण नगर येथे अनेक विकासकामे केल्या जात असुन या भागातील काही कामे प्रस्तावीत करण्यात आली आहे. दरम्यान आजवर विकासापासून दुर्लक्षित राहिलेल्या चंद्रपूर शहरातील हिंग्लाज भवानी वार्डाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या वतीने सदर मागणीचा सातत्याने पाठपूरावाही सुरु होता. अखेर त्यांच्या या पाठपूराव्याला यश आले असून येथील विविध विकासकामांसाठी नगर विकास विभागाच्या विशेष रस्ता अनुदाना अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून येथे सिमेंट क्राॅंक्रिट रोड, भुमीगत नाले व ईतर सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. 

  Print


News - Chandrapur
Related Photos