महत्वाच्या बातम्या

 औषधी दुकानांच्या संपकाळात रुग्णांची गैरसोय टाळण्याकरीता उपाययोजना


- औषधांसाठी संपर्क करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या २० मे रोजी ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने, संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

संपाच्या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तालुकानिहाय काही औषधी दुकाने सुरू राहतील, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी खालील व्यक्तिंशी संपर्क करावा.

चंद्रपूर : बंटी घाटे (मो. ९६०४७८९००५), जितेंद्र राजा (मो.९८५०३७८७८१), प्रशांत जाजू (मो. ९४२२१३६०७५), आकाश येरगुडे (मो.९०२१९७४३९३), सुमीत बावणे (मो.९४२०६५९९६४), विनय सबनीस (मो. ९४२२८३७६३३). घुग्घुस : गंधर्व भगत (मो.९९२२५१७१९४), बल्लारपूर : निशीकांत खैरे (मो. ९४२२१३९३८८), राजुरा : कैलास रेंगुटवार (मो. ९२७०१२२१८५), कोरपना : लक्ष्मीकांत देवतडे (मो. ९५४५६६७७८३), जिवती : मोहमद देशमुख (मो. ९८८१०१३६८५), पोंभुर्णा : विजयपाल पिपरे (मो. ७८७५६७६२१५), गोंडपिपरी : रविंद्र सोनुले (मो. ९४२१७१८७५२), भद्रावती : अविनाश पारोदे (मो. ९८५०७३८७५५), वरोरा : मनिष पिंपळशेंडे (मो. ९४२०३०४४०३), चिमूर : अजय चौधरी (मो. ९४२१७२१२५६), मूल : मनिष येलट्टीवार (मो. ९३२६१०९९७७), सिंदेवाही : राजेंद्र पशीने (मो. ९४२३६०८२२३), सावली : गजानन टोंगे (मो. ९४२२१९६१८०४), नागभीड : विजय बोरकर (मो. ९४२३६३८५६१), ब्रम्हपुरी : सुरेश अटवार (मो. ९४२३६४२२०५).

आणिबाणीच्या प्रसंगी औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी तथा त्यांच्या नातेवाईकांनी सहायक आयुक्त (औषधे) सुहास सावंत (मो. ८६०००२६३८५) आणि औषध निरीक्षक नालंदा उरकुडे (मो. ९०९६४१४१०४) यांच्याशी संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सावतं यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos