गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाची आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पाहणी : रुग्णांची विचारपूस करून आरोग्य सुविधांचा घेतला आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : डॉ. मिलिंद नरोटे यांनी १५ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली तसेच रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
रुग्णालयात उपलब्ध वैद्यकीय सेवा, औषधसाठा, स्वच्छता, कर्मचारी उपलब्धता तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज व्यक्त केली. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी आपण सतत कटिबद्ध असून, आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि सर्वसामान्यांना सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा निर्धारही आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




