महत्वाच्या बातम्या

 भरडधान्य विक्रीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी १ ते ३० एप्रिल पर्यत पुण करावी


- मक्का खरेदीसाठी ७ केंद्र निश्चित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : किमान आधारभुत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम २०२५ - २०२६ अंतर्गत मका (भरडधान्य) विक्रीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी ०१ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पुर्ण करावयाची असून खालील प्रमाणे केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नसेल त्यांनी संबंधीत केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणेसह, चालू हंगामाचा मका पिकाचा पिकपेरा (रब्बी २०२५-२०२६) नोंद असलेला शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा, नमुना ८ अ, शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँक पासबुकची अथवा रद्द धनादेशाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून वरिल खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी पुर्ण करावी तसेच जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंनी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ताभाऊ पानसरे, स्थानिक नेते सुनिल फुंडे यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos