स्वाधार योजना त्रुटी पुर्ततेसाठी ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेच आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या परंतू त्रुटीमध्ये असलेल्या अर्जातील त्रुटी पुर्तता करणेकरीता ३० एप्रिल, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून संबंधित विदयार्थ्यांनी ३० एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्जाची त्रुटी पूर्तता करून त्याची प्रिंट सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा येथे सादर करावी, सोबत विद्यार्थी लॉगीनवर स्टेटमेट बी व उपस्थिती अपलोड करावे, असे आवाहन आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी केले आहे.
निर्धारीत मुदतीत त्रुटी पूर्तता न झाल्यास अर्ज अपात्र ठरणार असल्याचा इशाराही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, भंडारा आशा कवाडे यांनी दिला आहे.
News - Bhandara




Petrol Price




