केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या जनकल्याणकारी वाटचालीवर प्रदर्शनी : बल्लारपुरात भाजपचा उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्ष बल्लारपूर शहराच्या वतीने विविध जनकल्याणकारी आणि राष्ट्रहितकारी योजनांवर आधारित भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनीचे उद्घाटन वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला भाजप चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, बल्लारपूर शहर भाजप अध्यक्ष ॲड. रणंजय सिंह, महासचिव घनश्याम बुरडकर, देवेंद्र वाटकर, सतीश कनकम, महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली जोशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, बूथ प्रमुख आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रदर्शनीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची आणि जनहिताच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून देशात झालेल्या परिवर्तनाचा आढावा यावेळी मांडण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा गौरव करत जनकल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
News - Chandrapur




Petrol Price




