महत्वाच्या बातम्या

 आसलपाणी जंगलातील घाटमारा देवस्थानाजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील आसलपाणी जंगलातील घाटमारा देवस्थान परिसरात बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास एका सुमारे ६५ वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला.

माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. प्राथमिक तपासात महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा हिंसात्मक लक्षणे आढळलेली नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला मतीमंद असून, गेल्या आठवड्यापासून परिसरात भटकताना दिसत होती.

घटना स्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी जे. एस. बेले, वनरक्षक दीपक उईके, तोताराम ब्राह्मणकर, मेश्राम तसेच देवणारा आणि आसलपाणी येथील पोलीस पाटील उपस्थित होते.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला असून, तपास सुरू आहे. तसेच, मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

गोबरवाही पोलिस विभाग या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून पुढील चौकशीसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos