महत्वाच्या बातम्या

 घाटंजी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी सखाराम ईसळकर यांच्या लाच प्रकरणाची सुनावणी १५ एप्रिल २०२६ रोजी


- अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांच्या न्यायालयात सुनावणी

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : सावरगांव मंगी येथील ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) विरुद्ध अद्यापही  कारवाई न झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ व गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी विरुद्ध तक्रारदारास संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय मुंबई कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्राला सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की (यवतमाळ) कार्यालयाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. 

घाटंजी तालुक्यातील सावरगांव मंगी येथील ग्रामपंचायत सदस्य युसूफखाॅ कासमखाॅ पठाण यांनी सावरगांव मंगी येथील ग्रामपंचायत सरपंच व सचिवाविरुद्ध सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी १७ जुलै २०२४ रोजी ग्रामविकास तथा पंचायतराज मुंबई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषदे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस अधीक्षक यवतमाळ व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक यवतमाळ आदींकडे लेखी तक्रारीतून केली होती. परंतु २ वर्ष लोटुनही मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की (जिल्हा परिषद यवतमाळ) व गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांनी संबधित सचिवाविरुद्ध अद्यापही कारवाई न केल्याने सावरगांव मंगी येथील  सचिवाला पाठीशी घालत असल्याचा आरोप युसुफ पठाण यांनी केला आहे. 

०१ एप्रिल २०२४ रोजी आपले सरकार पोर्टल वर व समक्ष सावरगांव मंगी येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची लेखी तक्रार ग्रामपंचायत सदस्य युसूफखाॅ पठाण यांनी केली होती. या संदर्भात घाटंजी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी सखाराम जयवंतराव ईसळकर (यवतमाळ) यांनी सावरगांव मंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयाचे दार बंद करुन चौकशी केली होती. विशेषतः सावरगांव मंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) यांनी चौकशी कामी कार्यालयीन दस्तऐवज सादर केले नाही. 

तसेच या बाबत घाटंजी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी सखाराम ईसळकर यांनी तसा अहवाल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे कडे सादर केला. सदरचा अहवाल सादर केल्यानंतर सुद्धा अद्यापही ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) सावरगांव मंगी यांचे विरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे येथे उल्लेखनीय. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी हे ग्रामपंचायत अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. 

या दरम्यान, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले घाटंजी पंचायत विभागाचे पंचायत विस्तार अधिकारी एस. जे. ईसळकर विरुद्ध जांब ग्रामपंचायतचे माजी सरपंच नथ्थु वेट्टी, सावरगांव मंगी येथील ग्रामपंचायत सदस्य युसूफखाॅ पठाण व कुर्ली ग्रामपंचायतच्या सदस्या मीराबाई हनमंतू किणाके आदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करुन विस्तार अधिकारी (पंचायत) एस. जे. ईसळकर यांचेकडून पारवा सर्कल काढून त्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली होती. परंतु पंचायत विस्तार अधिकारी सखाराम ईसळकर यांचे फक्त पारवा सर्कल बदलविण्यात आले. मात्र त्यांना निलंबित करण्यात आले नाही. 

विस्तार अधिकारी (पंचायत)  सखाराम ईसळकर यांचेवर भ्रष्टाचाराचा आरोप -
विशेष म्हणजे घाटंजी पंचायत समितीचे (पंचायत) विस्तार अधिकारी सखाराम जयवंतराव ईसळकर (यवतमाळ) हे नेर पंचायत समितीत प्रभारी गट विकास अधिकारी पदावर कार्यरत असतांना त्यांचे विरुद्ध भ्रष्टाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सखाराम ईसळकर हे नेर पंचायत समिती मध्ये प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असतांना त्यांनी चिकणी (डोमगा) ग्रामपंचायत अंतर्गत तंटामुक्त गांव समिती बक्षीस प्रकरण व मांगलादेवी येथील अंगणवाडीच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी चिकणी (डोमगा) ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गणेश सुगदे यांना ५ हजार  रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी रुपये २ हजार लाचेची रक्कम नगदी स्वरुपात देण्यात आली. नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून रुपये ३ हजार देण्यात आले. 

या वेळी विस्तार अधिकारी (पंचायत) एस. जे. ईसळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेर पोलीस ठाण्यात अपराध क्रंमाक ३०४५/२०१४ अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १३ - १ - Dr/W १३ - २ गुन्हा नोंदविला. सदर प्रकरणात शासनाची बाजू सहाय्यक सरकारी अधिवक्ता ॲड. अरुण मोहोड मांडली होती आता ते निवृत्त झाले आहे. घाटंजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) एस. जे. ईसळकर हे २ वर्ष निलंबित होते, अशी खात्रीलायक माहिती आहे. 

सदर खटला यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांच्या न्यायालयात  Spl.Case.ACB/००९/२०१४ प्रलंबित व सुरु आहे. सदर प्रकरणाची सुनावणी १५ एप्रिल २०२६ रोजी असून फिर्यादी / तक्रारदार गणेश सुगदे ( ग्रामपंचायत अधिकारी / सचिव ) यांचा पुरावा (EVIDENCE) झालेला असून उर्वरित पुरावे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात (यवतमाळ) घेणे सुरू आहे. एकंदरीत सदर खटल्याचा निकाल सुद्धा लवकरच लागणार असल्याची खात्रीलायक माहिती विधी विभागाकडून प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी अधिवक्ता हे शासनाची बाजू मांडत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos