महत्वाच्या बातम्या

 भंडारा येथे मोफत ब्युटी पार्लर व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या वतीने नि:शुल्क ब्युटी पार्लर व्यवस्थापन (Beauty Parlour Management) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हा प्रशिक्षण कार्यक्रम ८ एप्रिल २०२६ ते १२ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये ब्युटीशियनची संकल्पना व व्याप्ती, थ्रेडिंग व आयब्रो शेपिंग, मॅनिक्युअर व पेडीक्युअर, फ्रेंच मॅनिक्युअर, डिटेनिंग व चेहऱ्याचे ब्लीचिंग, थर्मो हर्ब फेशियल, हर्बल फेशियल, त्वचा घट्ट करणारे फेशियल, गॅल्व्हॅनिक व ओझोन उपचार, केसांची स्टाईल व कटिंग, प्रगत हेअर कटिंग, हर्बल हेअर केअर, बॉडी मसाज व बॉडी पॉलिशिंग, केस सरळ करणे, रिबॉन्डिंग, स्मूथनिंग तसेच पार्टी वधू मेकअप आणि वधूच्या हेअर स्टाईलचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना जेवण, चहा - नाश्ता, वही, पुस्तके तसेच राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी वय १८ ते ५० वर्षे असलेले, स्वयंरोजगाराची आवड असलेले व दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण पुरुष उमेदवार पात्र ठरणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादूर शास्त्री शाळेजवळ, महाबोधी विहारासमोर, शास्त्री चौक, भंडारा येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. 

मुलाखतीस येताना शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच मनरेगा जॉब कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी ९५११८७५९०८, ८६६९०२८४३३, ९७६६५२२९८४ व ८४२१४७४८३९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक मंगल निमजे यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos