महत्वाच्या बातम्या

 नागपूरात रवी भवन येथे आदिवासी विकास परिषद च्या वतीने भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचा भव्य सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नागपूर व भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या वतीने नागपूर येथील रवी भवन येथे नवनियुक्त भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते.

या प्रसंगी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कुमरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन मसराम, गणेश कुमरे, महेंद्र उईके, विकास चौधरी, पवन सिद्रे, प्रशांत टेकाम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी माजी आमदार डॉ. होळी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती, वनहक्क, तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा यांसारख्या विषयांवर उपस्थितांनी आपली मते मांडली. समाजाच्या प्रगतीसाठी संघटनात्मक बळकटी, शासकीय योजनांचा प्रभावी वापर आणि तरुणांच्या सहभागाची गरज यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत समाजहिताच्या कामात अधिक सक्रिय राहण्याचे आवाहन केले. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यात आदिवासी समाजाच्या विकासासाठी अधिक व्यापक पातळीवर काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.





  Print






News - Nagpur




Related Photos