गडचिरोलीत भाजप शहर मासिक बैठक संपन्न : सरल ॲप व शासन योजनांवर मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या शहरांतर्गत मासिक बैठकीचे आयोजन गुरुवारी दुपारी ३ वाजता कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले. या बैठकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
बैठकीत प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सरल ॲप संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले. विशेषतः SIR संदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे तसेच मतदान प्रक्रियेमधील विविध तांत्रिक बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्या समस्यांवर योग्य कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अँड. प्रणोती निंबोरकर, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती अनिलजी कुनघाडकर, भाजपा महामंत्री तथा नगर परिषद उपाध्यक्ष निखिलजी चरडे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा तथा महिला व बालविकास सभापती सीमा कन्नमवार यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




