महत्वाच्या बातम्या

 उंदीर मारण्याचे औषध प्राशन : उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : लाखनी तालुक्यातील कनेरी (दगडी) येथे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. विनोद गणपत ठवकर (वय ४३, रा. कनेरी, ता. लाखनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद ठवकर यांनी गावातील एका दुकानात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. औषध प्राशन केल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे कनेरी (दगडी) परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी पुढील तपास संबंधित पोलीसांकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos