महत्वाच्या बातम्या

 जवाहर वार्ड या ठिकाणी सौर ऊर्जा पाण्याच्या टाकीची बांधणी करा


- समाजवादी पक्षाने नगर पालिके कडे केली मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : शहरातील जवाहर वार्ड या ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. सदर परिसरातील नळ वाहीकेत गढूळ पाणी येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. समाजवादी पक्षाने नगर पालिकेकडे तक्रार दिल्या नंतर सदर नळ जोडणी पाईप लाईनचि तपासणी नगर पालिके तर्फे सुरू आहे. दररोज पाणी टँकरच्या साहाय्याने जवाहर वार्ड या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू आहे.

जवाहर वार्ड या ठिकाणी लवकरात लवकर पाईप लाईन दुरुस्त करावी तसेच ग्रामीण रुग्णालय परिसरात सौर ऊर्जेवर चालणारी पाणी टाकीचि निर्मिती करावी जेणे करून पाण्याचा प्रश्न मिटू शकेल सदर परिसरात सौर ऊर्जेवर चालणारी पाण्याची टाकी बसवावी अशी मागणी आज समाजवादी पार्टी अल्पसंख्यक विभाग जिल्हा अध्यक्ष खलील खान यांच्या नैत्रूत्वात नगर पालिका देसाईगंज मुख्याधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेबूब खान, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यक मुजीब शेख, जिल्हा कोषाध्यक्ष जीब्राइल शेख, देसाईगंज तालुका सचिव प्रितम जणबंधू, देसाईगंज तालुका अध्यक्ष अल्पसंख्यक मुन्ना शेख आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos