लाखनी तालुक्यात रेती चोरी उघडकीस, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लाखनी तालुक्यातील कनेरी (दगढ़ी) येथे १९ फेब्रुवारी दुपारी ११:३० वाजता रेती चोरीचा प्रकार उघडकीस आला. लाखनी-पालांदूर रस्त्यावर स्थित बाबा इंजिनिअरिंग वर्कशॉप समोर दोन व्यक्ती अवैधपणे रेती चोरी करत होते.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक प्रदिप गोंधळे (२५) आणि मालक निखील चौथे (३२) यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर संबंधित गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या प्रकरणातील इतर संभाव्य आरोपींविरुद्ध कारवाई केली जाईल. रेती चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी यावर कडक नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
News - Bhandara




Petrol Price




