२८ एप्रिल २०२३ पर्यंत भंडारा जिल्ह्यात ३७ कलम लागू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १८ एप्रिल रोजी शब-ए-कदर व २२ एप्रिल रोजी रमजान ईद आहे. त्या निमीत्याने काही ठिकाणी मिरवणुक तर काही ठिकाणी महाप्रसादाकरिता गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उन्हाळी हंगामाकरिता शेतकऱ्यांना बि-बियाने, खते, रासायनिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावेत व त्यांचा पुरवठा नियमित करावा, पुर्नवसन, वाढती महागाई तसेच विविध मागण्यांना घेऊन राजकीय पुढारी मजुर वर्ग व शेतकरी वर्गाला हाताशी धरुन धरणे, मोर्चे, आंदालने, निदर्शने आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने १४ एप्रिल २०२३ ते २८ एप्रिल २०२३ पर्यंत १९५१ च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) (३) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी महेश पाटील यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
News - Bhandara