विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधि / वर्धा : विषारी औषध प्राशन केल्याने प्रकृती गंभीर झालेल्या ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सावळी (खुर्द) येथे घडली. शांता तुळशीराम खंडाते ६० वर्धा, रा. कचेरी सावंगा, जि. नागपूर असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांता खंडाते यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. महिलेने विषारी औषध प्राशन करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.




Petrol Price




