वीर नारायणसींह बिंझवार शासकीय औ. प्र. संस्था, भामरागड, जि. गडचिरोली येथे ५ वा कौशल्य दीक्षांत समारोह संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : संस्थेत दिनांक २१ नोव्हेंबर २०२६, शनिवारला ५ वा कौशल्य दीक्षांत समारोह अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून भामरागड येथील प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक तपेश हलदर लाभले होते. तसेच संजय खंडाळकर, प्राचार्य, राजे विश्वेश्वरराव माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय, भामरागड, एन. एम. चव्हाण, प्राध्यापक, भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा, भामरागड तथा व्ही. एन. नन्नावरे, प्राध्यापक, जय पेरसापेन माध्यमिक आश्रमशाळा, भामरागड हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विजयकुमार एस. घडोले, गटनिदेशक तथा प्राचार्य (दैनंदिन कार्यभार) यांनी भूषविले.
याप्रसंगी संस्थेतील प्रत्येक ट्रेडमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थी तसेच संपुर्ण संस्थेमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, मेडल्स व मोमेंटोज देऊन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित मुख्य अतिथी, प्रमुख पाहुणे यांनी दीक्षांत समारोह, आयटीआय प्रशिक्षणाचे महत्त्व, करीअरच्या दृष्टिकोनातून भविष्यात करावयाची वाटचाल याविषयी समयोचित मार्गदर्शन केले तसेच संस्थेनी घेतलेल्या दिमाखदार दीक्षांत सोहळ्याचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संस्थेची प्रगतीपर वाटचाल याविषयी संस्थेचा अहवाल अंत्यत प्रभावी शब्दात विजयकुमार एस. घडोले सर यांनी कथन केला. कार्यक्रमाचे सुरेख संचालन कल्याणी चंडीकार मॅडम यांनी तर आभारप्रदर्शनमाधुरी वाघ मॅडम यांनी पार पाडले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करुन तसेच उपस्थित सर्वांना अल्पोपहार देऊन करण्यात आली. कार्यक्रमास भामरागड येथील विविध शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, संस्थेतील आजी, माजी प्रशिक्षणार्थी तथा पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम संस्थेतील सर्व कर्मचारीवर्गांच्या उत्कृष्ट सहकार्याने व समन्वयाने यशस्वीरित्या पार पडला.




Petrol Price




