गडचिरोली जिल्हयात आज एक जण कोरोनामुक्त तर नव्या बाधितांची संख्या शून्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज गडचिरोली जिल्हयात ६७९  कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोनाबाधितांची संख्या निरंक तर ०१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३०७९४ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३००३४ आहे. तसेच सद्या १३ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७४७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.०४ टक्के तर मृत्यू दर २.४३ टक्के झाला. 
आज कोरोनामुक्त झालेल्यामध्ये, चामोर्शी तालुक्यातील १, जणांचा समावेश आहे.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2021-10-12




Related Photos