लखमापूर-बोरी येथील जि. प. उच्च प्रा. केंद्र शाळेत रक्षाबंधन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व आणि त्यामागील सामाजिक व भावनिक संदेश याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा तसेच एकमेकांच्या संरक्षणाची भावना अधिक दृढ करणारा हा सण असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, प्रेम, स्नेह आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले होते. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरज पिपरे, मुख्याध्यापक नारदेलवार सर यांच्यासह बोडावर सर, बदखल सर, पठाण सर, घोडमारे सर, सोमणकर सर, सरकटे सर आणि उंदीरवाडे मॅडम यांची उपस्थिती होती.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा, बंधुभाव आणि संरक्षणाची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला. शालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांना सण-परंपरांचे महत्त्व समजून देतानाच सामाजिक मूल्यांची जडणघडण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.




Petrol Price




