सुगंधित तंबाखूचा ४३ हजारांचा साठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्रात विक्री व साठवणुकीस प्रतिबंध असलेल्या सुगंधित तंबाखूचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी लाखांदूर तालुक्यातील तई (बु.), येथे धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४३ हजार १७० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तंबाखूचा साठा घरात ठेवणारा विक्रेता आणि त्याला तंबाखूचा पुरवठा करणारा अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
३० ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० ते जप्तीमध्ये यांचा समावेश पालांदूर पोलिसांची कारवाई; विक्रेता व पुरवठादाराला अटक जप्त केलेल्या मालामध्ये इगल हुक्का शिशा सुगंधित तंबाखूची ३३ कंपनी सीलबंद पाकिटे (किंमत ३३ हजार रुपये) तसेच मजा १०८ सुगंधित तंबाखूचे नऊ डबे (किंमत १० हजार १७० रुपये) असा एकूण ४३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल आहे. २:३० वाजताच्या दरम्यान पालांदूर पोलिसांनी तई (बु) येथील लिलाधर प्रेमचंद निमजे (३२) याच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करीत हा साठा जप्त केला.
या प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी उत्तम मोहन चरडे यांनी पालांदूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. चौकशीदरम्यान आरोपी निमजे याने हा प्रतिबंधित तंबाखू अर्जुनी मोरगाव येथील सागर लंजे (अंदाजे ४०) याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने खरेदी केल्याचे समोर आले. त्यामुळे पुरवठादारालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले.
दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याया संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३० ऑक्टोबर रोजी रात्री दोघांनाही अटक करण्यात आली ठाणेदार विलास मुंढे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक बोळगीर तपास करीत आहेत.




Petrol Price




